Ticker

6/Breaking/ticker-posts

तालिबानकडून दोन हजार वर्षापूर्वीच्या खजिन्याचा शोध !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: अफगाणिस्तानमध्ये असलेल्या खजिन्याचा शोध घेण्यास तालिबानने सुरुवात केली आहे. हंगामी सरकारच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी खजिना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या खजिन्याचा चार दशकांपूर्वी उत्तरेकडील जवज्जन प्रांत केंद्रातील शेरबर्गन जिल्ह्यातील तेला तापा क्षेत्रात शोध घेण्यात आला होता. सध्या सोन्याचे हे भांडार 'अदृष्य' झाले आहे. तर, तालिबानला देश चालवण्यासाठी याची अधिक गरज आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्ला वासिक याने सांगितले की, संबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना बॅक्ट्रियन खजिना शोधण्यासाठी आणि तपास पूर्ण करण्यास सांगितले आहे. टोलो न्यूजनुसार, वासिक याने म्हटले की, सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामागील सत्यताही पडताळली जात आहे. जर, हा खजिना अफगाणिस्तानबाहेर पाठवला असल्यास तर, हा देशद्रोह असल्याचे त्याने म्हटले.

सरकार कडक कारवाई करणार

अधिकाऱ्याने सांगितले की, प्राचीन वस्तू देशाबाहेर नेण्यात आल्यास अफगाणिस्तान सरकार गंभीर कारवाई करणार आहे. नॅशनल जिओग्राफिक वाहिनीनुसार बॅक्ट्रियन खजिन्यात प्राचीन वेळेपासूनच्या जगभरातील सोन्याचे हजारो तुकड्यांचा समावेश आहे. वृत्तानुसार, या खजिन्यामध्ये २० हजारांहून अधिक वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये सोन्याच्या अंगठ्या, नाणी, शस्त्रे, बांगड्या, मुकुट आदी वस्तूंचा समावेश आहे. सोन्याऐवजी इतरही अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या