Ticker

6/Breaking/ticker-posts

पिकविम्याचं त्रांगड : शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस अधिकारी जबाबदार..; खा. डॉ. विखे पा.यांनी घेतली हजेरी


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).


पाथर्डी : पीक विम्या संदर्भात  शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी आपल्या कंपनीची आहे. हलगर्जी पणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नूकसानीस कंपनीचे अधिकारीच जबाबदार राहीतील आशा कडक शब्दात खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी भारती अॅक्सा जनरल  इन्श्युरन्स या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


पाथर्डी र तालुक्यातील पीक विमा योजनेचे काम भारती अॅक्सा जनरल  इन्श्युरन्स कंपनीला मिळाले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून या कंपनीला शेतकऱ्यांचे आॅफलाईन अर्ज दाखल करून घेण्याबाबत सूचना दिल्या. मात्र या कंपनीचे कार्यालय सातत्याने बंद असते. कंपनीचे अधिकारी फोन उचलत नाहीत, आशा तक्रारी शेतकऱ्यानी खा. सुजय विखे पाटील यांच्याकडे केल्या होत्या.


खा.विखे यांनी  थेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या तक्रीरीबाबत लक्ष वेधले.विमा कंपन्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये आधीच संतापाची भावना आहे.यापुर्वी शेतकर्याची झालेली फसवणूक यामुळे सर्व राज्यात शेतकरी संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.ही परीस्थिती निर्माण होवू नये म्हणून आपल्या कंपनीने शेतकऱ्यांना चांगली सुविधा द्यावी कार्यालय सुरू ठेवावे आणि शेतकऱ्यांना चांगली सेवा देणारे प्रतिनिधी नेमावेत आशा सूचना खा.विखे यांनी केल्या.


याबाबत आपण गांभीर्य न दाखविल्यास शेतकऱ्यांबरोबर मलाही आपल्या कंपनीच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा खा.विखे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.त्याचप्रमाणे कृषी अधिकार्यानी देखील शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यात येत असलेल्या अडचणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या