Ticker

6/Breaking/ticker-posts

खड्डे चुकवण्याच्या नादात ट्रेलर थेट रस्ता सोडून शेतात

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 रुईछत्तीसी: नगर-सोलापूर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागाकडे वर्ग झालेला असुन दुरुस्तीसाठी या विभागाच्या खात्याने जवळपास ९ कोटी रुपये निधी मंजूर होऊन प्रत्यक्षांत कामास सुरुवात झाली आहे. बरेचसे खड्डे या आधी बुजवण्याचे काम झाले. परंतु गेल्या हप्त्यातील पावसाने ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. असाच एक ट्रेलर खड्डे चुकविण्याच्या नादात थेट शेतात जाउन फसला. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.

 या खड्डे बुजवण्यास डांबराची गुणवत्ता कमी टक्के असल्याने हे खड्डे पडत असल्याचे जाणकारांचे मत आहे. हे खड्डे वाळुंज,पारगाव, शिराढोण, वाटेफळ, रुईछत्तीशी , दहिगाव, या अंबिलवाडी या आदी गावच्या हद्दीत मध्ये खड्डे पडले आहेत.  पंरतु छोट्या खड्डयाचेचे रूपांतर मोठ्या खड्ड्यात होत आहे.  हा रस्ता खुप अवजड वाहनांच्या रहदारीचा आहे.

 ‌या ठिकाणी काही रस्ता चांगला असल्याने वाहनचा वेग जास्त असतो. अचानक पणे समोर खड्डे आल्यामुळे ब्रेक दाबले जातो. त्यामुळे यात छोटे मोठे अपघात घडत आहे. तरी या खड्डे कडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यानी व ठेकेदाराने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक करत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या