Ticker

6/Breaking/ticker-posts

नोकियाची जिओला जोरदार टक्कर, भारतात लाँच केला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन

 

Nokia C01 Plus भारतात लाँच.

फोनची किंमत फक्त ५,९९९ रुपये.

फोनमध्ये मिळेल २ जीबी आणि १६ जीबी स्टोरेज.लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : Nokia ने आपला सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल स्मार्ट्फोन  Nokia C01 Plus ला भारतात लाँच केले आहे. Nokia C01 Plus स्मार्टफोनची टक्कर  Jio Phone Next शी असेल. फोनची किंमत फक्त ५,९९९ रुपये आहे. फोनला सर्व रिटेल स्टोर्स, Nokia.com आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. फोन ब्लू आणि पर्पल रंगात येतो. फोनमध्ये २ जीबी आणि १६ जीबी स्टोरेज मिळेल.


फोनला JioExclusive ऑफरसह १० टक्के डिस्काउंटनंतर ५,३९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन खरेदीनंतर २४९ रुपयांचा Jio रिचार्ज केल्यास Myntra, PharmEasy, Oyo आणि MakeMyTrip वर ४ हजार रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील. फोनला दोन वर्ष सिक्योरिटी अपडेट मिळेल. सोबतच, फोनवर एक वर्षापर्यंत स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देखील मिळेल.


स्पेसिफिकेशन्स

फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये शिफ्ट होणाऱ्या यूजर्ससाठी 
Nokia C01 Plus उत्तम पर्याय आहे. फोनमध्ये ५.४५ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच, १.६ Ghz ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. फोनच्या रियर पॅनेलवर ५ मेगापिक्सल HDR कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला फ्लॅश सपोर्टसह २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

फोन लेटेस्ट अँड्राइड ११ (Go Edition) ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. पॉवरसाठी यात ३००० एमएएचची बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये बॅटरी एक दिवस टिकेल. फोनमध्ये फेस अनलॉक सपोर्ट देखील मिळतो.

 

स्पेशिफिकेशन

परफॉर्मन्स

MediaTek Helio P35

डिस्प्ले

5.45 inches (13.84 cm)

स्टाेरेज

32 GB

कॅमेरा

5 MP

बॅटरी

4000 mAh

price_in_india

7278

रॅम

3 GB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या