Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव पोलीसांच्या जाचाला कंटाळून बालमटाकळीच्या तरुणाची आत्महत्या ; आरपीआय कार्यकर्त्यांचा आरोप, आवारात घोषणाबाजी-गोंधळ


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 बालमटाकळी/ शेवगाव : येथील अदित्य अरुण भोंगळे वय १७ याने शेवगाव पोलीसांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याचा आरोप आरपीआल कार्यकर्त्यानी करून आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या त्या चार पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

याबाबत चे सविस्तर वृत्त असे की बालमटाकळी येथील मयत अदित्य अरुण भोगळे याला शेवगाव पोलीस स्टेशनच्या चार पोलीसांनी दोन दिवसापूर्वी दुचाकी चोरीच्या व गावढी कट्या च्या खरेदी विक्री प्रकरणी संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते नंतर काल त्याला सोडून दिले काल रात्री साधारण अकरा ते साडे अकराच्या दरम्यान त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. आज सकाळी पोलीसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात आनला पण मयत अदित्य ची आई श्रीमती संगीता अरुण भोंगळे हीने सांगीतले की माझ्या मुलाला पैश्या साठी पोलीस त्रास देत होते त्यांनी पन्नास हजार रुपयाची मागणी केली मी बचत गटाचे पैसे काढून ४७ हजार रुपये पोलीसांना दिले. आणी राहीलेले तीन हजार रुपये पोलीसांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर फोन पे व्दारे पाठवले .


हे सर्व ऐकल्यावर शेवगाव चे दलित नेते यांनी शेवगाव पोलीस स्टेशन ला जमा झाले आणी आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या त्या चार पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली दुपाची तीन वाजे पर्यंत पोलीसांकडून काहीच हालचाल न  झाल्याने संपूर्ण तालुक्यातून आणी शेवगाव शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने जमा झाले दुपारी चार वाजता शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये मयत अदित्य भोंगळे याचा  मृतदेह आनला आणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे तणाव निर्माण झाला. दोषी पोलीसांवर गुन्हे दाखल करा, भष्टाचारी पोलिसांचा धिक्कार असो अशा घोषणांनी पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून सोड्ला.  नंतर पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे घटनास्थळी आले आणी मयत अदित्यच्या आईचा इन कॅमेरा जबाव घेवून दोषी पोलीसांवर कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यावर मृतदेह घेवून रुग्णवाहीका अंत्यविधीसाठी बालमटाकळीकडे गेली.


यावेळ जेष्ट नेते पवन कुमार साळवे, शिवसेना तालूका अध्यक्ष आणी पंचायत समिती चे माजी सभापती ॲड. आविनाश मगरे, वंचित चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भटक्या विमुक्त संघटनेचे राज्याचे नेते बाळासाहेे गायवाड , माजी सभापती प्रकाश भोसले ,आर पी आय चे तालुका अध्यक्ष विजय बोरुडे, बाजार समितीचे माजी सभापती अनिल इंगळे, पंचायत समिती चे उप सभापती भाऊराव भोंगळे, वंचित चे तालूका अध्यक्ष प्यारेलाल शेख,बोधेगाव चे माजी सरपंच रामजी अंधारे, शेवगाव चे माजी सरपंच राहुल मगरे, नगर सेवक प्रविण भारस्कर, अनिल बोरुडे , संतोष बानायत , भगवान मिसाळ,कडू मगर,राजू मगर, गौरव मगर,अरुण भोगळे, रोहीदास भोंगळे, संतोष पटवेकर , सतिष मगर इत्यादिंनी पोलीस स्टेशनला आंदोलनात भाग घेवून दोषी पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या