Ticker

6/Breaking/ticker-posts

.. तर मुलाबाळांसह पिंपळगाव माळवी तलावात आत्मदहन करु

 

*मनपाच्या नियोजित प्रकल्पास अदिवासींचा विरोध 


  लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)नगर /पिंपळगाव माळवी : महानगरपालिकेच्या वतीने पिंपळगाव माळवी तलाव क्षेत्रावर उभारण्यात येणा-या नियोजित प्रकल्पाच्या निर्णयाला तलाव परिसरात राहणा-या आदिवासी समाजाकडून प्रखर विरोध करण्यात येत आहे. आदिवासी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 पिंपळगाव माळवी तलावाच्या सुमारे सातशे एकर क्षेत्रावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद झाली आहे. पुर्वी हे क्षेत्र शिंदे सरकारच्या नावावर होते. अनेक पिढ्यांपासून याठिकाणी आदिवासी समाज वास्तव्यास आहे. महादजी शिंदे सरकारच्या काळात पिंपळगाव माळवी तलावातील भिल्ल समाजाच्या बंडाची इतिहासात नोंद आहे. शेकडो वर्षांपासून आदिवासी समाजाचे येथे वास्तव्य आहे. 

 २-३ वर्षापुर्वी तलावातील क्षेत्रावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद झाली. असे असले तरी अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहणा-या आदिवासी बांधवांच्या नावाची नोंद सदर क्षेत्रावर  लावण्यासाठी संघर्ष सुरु आहे. यासाठी दिल्ली येथील अनुसुचित जनजाती आयोगाकडे या प्रकरणी कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. आयोगाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर स्थानिक प्रशासनाला तलावातील आदिवासींना शाळावीज,रस्तेघरं या पायाभुत सुविधा देण्याबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. परंतु स्थानिक प्रशासनाने त्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आदिवासींच्या वतीने करण्यात आला आहे.

 महानगरपालिकेच्या पदाधिका-यांनी प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. येथे उभारण्यात येणारा प्रकल्प श्रीमंतांना हौस-मौज करण्यासाठी उभारला जात असला तरी दुस-या बाजुला येथे कामयस्वरुपी वास्तव्यास असलेल्या गरीब आदिवासी कुटुंबीयांची जगण्यासाठीची लढाई कुणालाही दिसत नाही. भावनाशून्य प्रशासन राजकारण्यांनी आपल्या संवेदना जागृत ठेवाव्यात. अदिवासी बांधवांची जगण्यासाठीची सुरु असलेली धडपड कुणाला ही दिसत नाही ही शोकांतिका आदिवासी समाजाने व्यक्त केली. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महानगरपालिकेला नियोजीत प्रकल्प उभारु देणार नाही वेळप्रसंगी आम्ही मुला बाळांसह तलावात आत्मदहन करू असा इशारा आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी बाळासाहेब पवारगंगाधर माळीरामदास बर्डेआकाश गायकवाडसंजय गायकवाडलक्ष्मण वाघसुभाष माळीदिलीप पवारकोंडीराम गायकवाडगणेश बर्डे यांच्यासह आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

तलाव हेच उपजिवीकेचे साधन

येथे वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेला आदिवासी समाज तलावांमध्ये मासेमारी तसेच तलावाच्या कडेला थोडीफार शेती करून आपली उपजीविका भागवतात. आदिवासींच्या नावावर जागाच नसल्याने सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. इतरत्र घरकुल मिळाले तरी जीवन जगण्यासाठी तलावाचा आश्रय घ्यावाच लागेल. त्यामुळे आमचा महापालिकेच्या प्रकल्पाला कायमस्वरूपी विरोध राहील. बाळासाहेब पवार (अध्यक्ष एकलव्य आदिवासी विकास संस्था)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या