Ticker

6/Breaking/ticker-posts

ना.छगनराव भुजबळ यांची निर्दोष मुक्तता ; समता परिषदेच्यावतीने नगरमध्ये जल्लोष

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

नगर: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक ना.छगनराव भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल  नगरमधील माळीवाडा येथे समता परिषदेच्यावतीने फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी सरचिटणीस अंबादास गारुडकर, विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, जि.प.सदस्य शरद झोडगे, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, जालिंदर बोरुडे, अशोकराव गोरे, विष्णूपंत म्हस्के, बजरंग भुतारे, बाळासाहेब भुजबळ, नाना लोखंडे, शरद पोटे, प्रसाद शेरकर, शरद काळे, मंदार लोखंडे आदि उपस्थित होते.

यावेळी अंबादास गारुडकर म्हणाले, ना.छगनराव भुजबळ यांच्यावर दिल्लीमधील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी त्यांच्यावर खोटे-नाटे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. दोन वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना या प्रकरणी नाहक तुरुंगात रहावे लागले. मात्र वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास सत्य आणून दिले. आणि ना.भुजबळ साहेबांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा सत्यचा विजय असून, त्यांच्यावर आरोप करणार्‍यांना ही चपराक असल्याचे श्री.गारुडकर यांनी यावेळी सांगितले.या

प्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, ना.छगनराव भुजबळ यांचे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्याने त्यांना या प्रकरणात गुंतवणे म्हणजे हे एक राजकीय षडयंत्र होते. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता. विनाकारण त्रास देण्याच्या हेतून ना.भुजबळ साहेबांवर हे आरोप केले गेले. आता न्यायालयाने त्यांची मुक्तता केल्याने वैयक्तिक द्वेषातून केलेले हे आरोप होते हे सिद्ध होते. या निकालामुळे ना.छगनराव भुजबळ साहेब यांची जनमाणसातील स्वच्छ चारित्र्याची प्रतिमा आणखी उंचावली असल्याचे सांगितले.  मच्छिंद्र गुलदगड, सुभाष लोंढे, बाळासाहेब बोराटे,शरद झोडगे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या