Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी रफिक शेख

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 पाथर्डी : तालुक्यातील करंजी येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांची नुकतीच शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल करंजी ग्रामस्थांच्यावतीने शेख यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी रफिक शेख म्हणाले शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे व दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या माध्यमातून मला जिल्हा उपप्रमुख पदाची संधी मिळाली असून यापूर्वी या पदाची जबाबदारी मिरी करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य स्वर्गीय अनिलराव कराळे यांच्याकडे होती त्यांच्या निधनामुळे या पदावर मला काम करण्याची संधी मिळाली स्वर्गीय कराळे यांचे विचार व कार्य यापुढील काळात सर्व शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन करणार असल्याचे शेख म्हणाले. 

यावेळी मार्केट कमिटीचे संचालक अशोकराव आकोलकर, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक शरद अकोलकर, आबासाहेब आकोलकर, रावसाहेब मुरडे, अभय गुगळे, भानुदास आकोलकर, बाबासाहेब क्षेत्रे, छगनराव क्षेत्रे, ग्रामपंचायत सदस्य रोहित आकोलकर, सूनील अकोलकर, बाबा गाडेकर, अंबादास टेमकर, बाळासाहेब आकोलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या