*पाणी शेतीपीकात शिरल्याने बाजरी, सोयाबीन, कपाशी सड्ले
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : मराठवाड्यातील पैठण स्थीत जायकवाडी नाथसागर धरणाच्या पाणी पातळीत
सप्टेंबर महिन्यात झपाट्याने वाढ होत असून
मोठ्या प्रमाणात जलाशयात पाणलोट क्षेत्रातुन पाणी जमा होत असल्याने जवळपास ८५
टक्के पाणी साठा झाला आहे. अशीच आवक सुरु राहिली
तर धरण लवकरच ओव्ह्फ्लो होईल. त्यामुळे लाभ क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पाणी शंभर टक्के खुनेकडे सरकत
आहे. मुबलक पाणीसाठा जलाशयात झाल्याने मात्र जलाशयाच्या कडेला ( काठावर ) असलेल्या
जमिनीवरील शेतात उभ्या पिकात जलाशयाच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे
जलाशयाच्या काठावरील शेतकऱ्यांनी पेरलेल्या खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, तुर, कपाशी आणि ऊस पीकात
धरणाचे पाणी आले आहे.
जलाशयाच्या कडेच्या नगर जिल्ह्यातील
शेवगाव - नेवासा तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर- पैठण तालुक्यातील शेतीतील सर्वच
खरीप पिकात जलाशयाच्या पाण्याचा प्रवेश झाला असून संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी
पेरलेल्या सर्वच पिके पाण्यात जाणार आहेत. ( पाऊसमान व पाणलोट क्षेत्रातुन जलाशयात
येणारा पाणी साठा लक्षात घेता धरण शंभर टक्के भरणार असल्याने सर्व पिके पाण्यात जातील
) गेल्या दोन वर्षा पासून धरण सलग भरत आहे. मागील वर्षी धरणाचे पाणी असंपादित
क्षेत्रात आले होते. सद्यस्थितीत जायकवाडीच्या शेवटच्या खुणे पासून ५०० ते ६०० फूट पर्यंत संपादित
क्षेत्र सध्या रिकामे आहे.
जवळपास काठच्या सर्वच गावातील संपादित
क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी पिके घेतलेली आहेत. बहुतांश शेतीतील पिके ही जायकवाडी
धरणाच्या ८० टक्के पाणीसाठा च्यापुढे लागवड केलेली आहेत. त्यामुळे जलाशयाच्या ८०
टक्के च्या नंतर अनेक पिके पाण्यात जायला सुरूवात होते. आता झाली आहे. धरण सलग
भरल्याने पिकपेरा कमी व काठावरील शेतातच घेतल्याने यावर्षी उशिरा पिके पाण्यात
गेलेली आहेत. ऊस पीक वगळता बाकी सर्व खरीप पिके जलमय झाली आहे. शेतकऱ्यांनी केलेला
खर्च वाया जाणार आहे.
0 टिप्पण्या