Ticker

6/Breaking/ticker-posts

सर्वसामान्य जनतेला केंद्र्स्थानी ठेवुन काम करणारेच कामी येतात- घुले पा.

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव-:-  कोणत्याही संघटनेत काम करताना सर्वसामान्य जनतेला केंद्र्स्थानी ठेउन त्यांच्या मदतीला वेळेवर जे लोक पुढे येतात तेच पक्ष संघटनेच्या कामी येतात असे प्रतिपादन मा.आ. चंद्रशेखर घुले यांनी केले.

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस  सुधीर शिरसाठ यांनी खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालयात सुराज्य रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने शेवगाव तालुक्यातील वडूलेवाघोलीनिंबेनांदूरढोरजळगावगरडवाडीचव्हाणवाडीदिंडेवाडीमळेगावआव्हाने व अमरापूर परिसरातील गरजू शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात युरिया खताचे वाटपकोरोना संसर्गाच्या काळात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्सआशा सेविका व अंगणवाडी सेविकांचा 'कोरोना योद्धा सन्मानव कोरोनामुळे निधन झालेल्या पालकांच्या कुटुंबातील ५२ गरीब निराधार विद्यार्थिनींना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण मा.आ. चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.

     या कार्यक्रमास ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडेकेदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणेराष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळेराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,  अमरापूर च्या सरपंच संगिता पोटफोडे व उपसरपंच शारदा बोरुडेबबनराव भुसारीविजय पोटफोडेअरुण बोरुडेवडुले बुद्रुक चे सरपंच प्रदिप काळेसंतोष जाधवदिलीप आव्हाडरमेश आव्हाडअंबादास कळकरचंद्रकांत रणमलेपांडुरंग नागरेडॉ. अरविंद पोटफोडेवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या