Ticker

6/Breaking/ticker-posts

अतिवृष्टी झालेल्या नुकासानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : पं. स. सदस्या शिला खेडकर


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार : अतिवृष्टी झालेल्या नुकासानीचे सरसगट पंचनामे करण्याचे कुषी सायहक कामगार तलाठी यांना आदेश दया झालेल्या नुकसानीची   नुकसान भरपाई द्या अन्यथा खरवंडी कासार येथे रस्ता रोखो करणार असल्या बाबतचे  निवेदन  पंचायत समिती सदस्या     सौ .शिला खेडकर  यांनी पाथर्डी चे तहसिलदार श्याम वाडकर यांना दिले आहे

पाथर्डी च्या  पूर्व भागात भालगाव गटात भालगाव खरवंडी कासार भारजवाडी मालेवाडी मिडसांगवी जवळवाडी  ढाकणवाडी जवळवाडी मुंगूसवाडे सततच्या  पडणाऱ्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये शेतीमध्ये असलेला पिके पिवळसर पडली आहेत मूग उडीद या कडधान्य पिकाला पावसामुळे कोंब आले आहेत त्यामुळे व्यापारी वर्ग या शेतीच्या मालाला घेत नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा नाहीतर शासनाच्या विरोधात खरवंडी कासार येथे रस्ता रोखो  आंदोलन केले  जाईल असा  त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी किरण खेडकर मिडसांगवी चे उपसरपंच विष्णु थोरात मुगुंसवाडे चे सरपंच प्रविण खेडकर मालेवाडी चे सरपंच अजिनाथ दराडे भारजवाडीचे उपसरपंच कृष्णा बटुळे  बापु मोहीते सखाराम खेडकर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या