Ticker

6/Breaking/ticker-posts

रेल्वे स्टेशनच्या माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ ; वंचित बहुजनचा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

 
        


  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर:  रेल्वे स्टेशनचे ठेकेदार हुंडेकरी यानी संपामुळे कामगार येतं नाहीत, असं खोटं बोलून प्रशासनाची फसवणूक केली आहे. माथाडी कामगारांची अडवणूक करुन सुमारे ४० दिवसांपासून माथाडी कामगारांचे काम बंद केले आहे.  काम नसल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, म्हणुन वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व कामगार युनियनच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसह दि . १४/०९/२०२१ पासून सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनिल भिंगारदिवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

   यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण,शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप,उपाध्यक्ष प्रवीण ओरे,भाऊ साळवे,मनोज कर्डिले,रेल्वे माथाडी कामगार अमर डाके,गौतम सैदाणे,अशोक देवकर, अमर ठाकूर,अमोल रणदिवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या