Ticker

6/Breaking/ticker-posts

साई संस्थान फुटेज व्हायरल प्रकरणी ६ अटकेत ; खळबळ

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शिर्डी :  साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष यांचे मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी साई संस्थांनचे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह इतर पाच जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात बदनामीसह  शासकीय गुपिते कायद्यार्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 

साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष यांची बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवळी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हा न्यायाधीश, सहायक धर्मादाय आयुक्त यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिडी चे अनुक्रमे अध्यक्ष व सदस्या तदर्थ समिती म्हणुन नियुक्त केलेले असताना व कर्तव्याचा भाग म्हणुन दि.३१ जुलै रोजी तदर्थ समितीची बैठक संपल्यानंतर समितीपुढील विषयसुचीतील विषय क्र.२७/४/६७ च्या अनुषगाने दि.३१ जुलै रोजी ५ ते ६ वाजे दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता गेले होते , त्याचा मंदिर प्रवेश हा कोव्हीड नियमांचे उल्लंघन असल्याबाबत प्रसार माध्यमामध्ये बातमी प्रसारीत झालेली होती. तसेच सदर प्रसारीत झालेल्या बातम्यामध्ये काही फोटो व व्हिडीओ दाखवुन बातमी करण्यात आलेली होती.

प्रशासकीय विभाग प्रमुख राजेंद्र जगताप , श्री साईबाबा संस्थान सोसायटीचे कर्मचारी अजित जगताप, कर्मचारी सचिन गव्हाणे , राहुल फुंदे , सी.सी.टी.व्ही विभाग प्रमुख विनोंद कोते, कर्मचारी चेतक साबळे व इतर यांचेविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. बुधवारी आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने या संपूर्ण कारवाईने साईसंस्थांनच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या