Ticker

6/Breaking/ticker-posts

घोडेगावात कांदा 2700 रुपये क्विंटल ;शेतकऱ्यांमध्ये समाधान

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 घोडेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपआवार घोडेगाव येथे बुधवारी झालेल्या कांदा लिलावात दर्जदार कांद्यास प्रति क्विंटल २७०० रुपये  इतका उच्चांकी भाव मिळालागेल्या अनेक महिन्यापासून कांदा दराबाबत होत असलेली घसरण थांबून भावाने उसळी घेतली, भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 काल नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती उपआवार घोडेगाव येथे सुमारे पाच हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती, सकाळी लिलावास सुरुवात झाली, यामध्ये कमीत कमी पाचशे रुपयांपासून जास्तीत जास्त २७०० रुपयांपर्यंत लिलावात भाव मिळाले.

 गेल्या सात महिन्यापासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांदा पिकवला होता,कांदा चाळी मध्ये साठवलेल्या या कांद्यास गेल्या काही महिन्यापासून १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत होता, कांदा चाळीत खराब होत असलेला कांदा मिळेल त्या भावात अनेक शेतकऱ्यांना विक्री करावा लागला होता. राज्यात नवीन लाल कांद्यास अवधी असल्याने व शेजारील राज्यात मागणी वाढली आहे तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांदा लागवड क्षेत्र कमी झाले आहे, त्यामुळे कांदा दरात तेजी आली आहे.

 चाळीमध्ये साठवलेला कांदा टिकत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला , ठराविक शेतकऱ्यांकडे कांदा आहे,तर अनेकांकडे अत्यल्प कांदा शिल्लक राहिला असून भाव वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कांदा लिलावात उपस्थित शेतकऱ्यांनी भाव वाढ होताच सोशल मीडियात भाववाढीचे मेसेज व्हायरल करत आनंद व्यक्त केला. 

मिळालेले  भाव

मोठा माल   - 2100-2200

मध्यम मोठा - 1800-1900

मध्यम  माल - 1500-1600

गोल्टा/गोल्टी - 1100-1500

जोड 500/600

 No 1 - /2  वक्वल - 2500 - 2700 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या