Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दणक्यानंतर नगरचे कार्यकारी अभियंता आले भानावर

 *सभापती काशिनाथ दातें चिवट पाठपुरावा

 *रस्त्यांच्या कामांना ८ दिवसात सुरवात..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पारनेर: तालुक्यासाठी कार्यारंभ आदेश झालेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील रस्त्यांची कामे प्रलम्बित  अस्ल्याने सभापती काशिनाथ दाते यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्यासह मंत्रालय मुंबई येथे जावुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सदर प्रश्नाबाबतचे पत्र दिले व सदर रस्ते वाहतुकीचे दष्टीने अतिशय महत्वाचे असल्याचे सांगीतले व मुख्यमंत्र्यांना संबंधितांना आदेश करण्यासाठी विनंती केली.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाशी संपर्क करत आपला ठाकरी हिसका दाखविल्याबरोबर नगरचे कार्यकारी अभियंता भानावर आले.

तालुक्यासाठी कार्यारंभ आदेश झालेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील रस्त्यांची कामे राज्य सरकारने, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्याने मंजूर केलेली असुन,सदर कामे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचे प्रयत्न व शिफारशीने शासनाने मंजूर केलेली आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे तर,कामांची मंजुरी व निविदा प्रक्रिया यामधे दोन वर्षाचा कालावधी गेला होता. परंतु आता कार्यारंभ आदेश होऊनही अद्याप हि कामे सुरु झालेली नाहीत. तरी हि सर्व कामे तत्काळ सुरु करावित अशी मागणी जि.प. बांधकाम व कृषी समीतीचे सभापती काशिनाथ दाते यांनी, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग,स्टेशनरोड, अहमदनगर यांना केली होती. तरीसुध्दा काम सुरु न केल्यामुळे अखेर सभापती काशिनाथ दाते यांनी २७ सप्टेंबर पासुन प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अहमदनगर येथील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येईल असा इशारा  दिला होता.

 त्यानंतर दि.२२ सप्टेंबर रोजी सभापती काशिनाथ दाते यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्यासह मंत्रालय मुंबई येथे जावुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सदर प्रश्नाबाबतचे पत्र दिले व सदर रस्ते वाहतुकीचे दष्टीने अतिशय महत्वाचे असल्याचे सांगीतले व मुख्यमंत्र्यांना संबंधितांना आदेश करण्यासाठी विनंती केली.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाशी संपर्क करत आपला ठाकरी हिसका दाखविल्याबरोबर नगरचे कार्यकारी अभियंता भानावर आले व त्यांनी सभापती दाते यांना पत्र पाठविले व उपोषणपासुन  रद्द करावे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील एकुण ८ मंजुर कामांपैकी ३ कामे सुरु करण्यात आली असुन, बाकीची कामे ८ दिवसामधे सुरु करत असल्याचे कळ्विले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या