Ticker

6/Breaking/ticker-posts

सीनानदी पूर नियंत्रण रेषा फेर सर्वेक्षणाचे मंत्री जयंत पाटील यांचे आदेश

 आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 अहमदनगर : आ.संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे सीना नदीचे पूर नियंत्रण रेषा मध्ये फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती या मागणीनुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर दौऱ्यावर आले असता जिल्हा प्रशासनाला सदर पूर नियंत्रण रेषाची पुन्हा फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन सीना पात्रातील अतिक्रमणे काढावी, तसेच नदीपात्राची खोलीकरण व रुंदीकरण करावे व सीना नदी सुशोभिकरना साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत दिली.

          राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सीना नदी पात्राची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत आ. संग्राम जगताप,आ.डॉ.किरण लहामटे, मा.आ.नरेंद्र घुले,उपमहापौर गणेश भोसले,मनपा आयुक्त शंकर गोरे,स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नलकांडे आदी उपस्थित होते.

      यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की,सीननदी पूर रेषाचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता याच पार्श्‍वभूमीवर आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर शहराच्या दौऱ्यावर आले असता जिल्हा प्रशासनास पुन्हा फेर सर्वेक्षण करा असा आदेश देऊन नदी पात्राची पाहणी केली तसेच सीना नदीचा उगम नगर शहरा जवळच होत आहे. 50 वर्षात कधीही सीना नदीला महापूर आला नाही व कुठल्याही प्रकारची वित्तहानी झाली नाही सध्या सीनानदी ची पूररेषाचे अंतर 500 मीटर असल्याने शहर विकासाला गती देण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे याच बरोबर नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते, यासाठी सीना नदी पात्राचे पुनर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे जेणे करून नगर शहरातील 25 ते 30 टक्के नागरिकांना या सर्वेक्षणाचा लाभ होईल याच बरोबर सीना नदी पात्राचे खोलीकरण करून पात्रा भोवती असलेले अतिक्रमण काढावे असे ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या