लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मिरजगाव
: कर्जत तालुक्यातील
निमगाव गांगर्डा येथील सीना ओव्हरफ्लो झाले आहे. कर्जत , श्रीगोंदा व आष्टी तालुक्यासाठी
जीवनदायिनी असलेले सीना धरण सलग दुसऱ्या वर्षी क्षमतेने भरल्याने सीना धरण
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धरण
पूर्ण क्षमतेने भरल्याने सीना नदीपात्रात ५६ क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू असून
धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सीना धरणाच्या उजव्या कालव्यातुन आज
(दि.२८ सप्टेंबर रोजी) १०० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात २८
व २९ ऑगस्ट रोजी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्याता वर्तविण्यात
आली आहे, त्यामुळे
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन
नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली
आहे. त्या अनुषंगाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाच्या
कमी प्रमाणामुळे सीना धरण झाल्यापासून ते भरण्याची वेळ एक तर फार कमी वेळा येते, परंतु यंदा सीना धरण आवक
क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे सीना धरण सप्टेंबर अखेर भरले आहे. गतवर्षी
जुलै अखेर धरण भरल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पहिले धरण भरण्याचा मान सीना धरणाला
मिळाला होता.जिल्ह्याच्या पूर्व व मध्य भागात झालेल्या दमदार पावसामुळे प्रथमच
जुलैमध्ये हे धरण भरले असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला
आहे. सीना धरणाची क्षमता दोन हजार चारशे दशलक्ष घनफूट
आहे.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे हे धरण आहे. अहमदनगर तालुक्यातील
जेऊर, बहिरवाडी, पिंपळगाव माळवी,
अहमदनगर आदी ठिकाणी झालेल्या पावसावरच या धरणाची भिस्त आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात सर्वंच नक्षत्रांत चांगला पाऊस झाला.
अहमदनगरहून सीना अनेकदा वाहती झाली. सीनेच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रातही पाऊस चांगला
असल्याने हे धरण भरले आहे. या धरणाचा फायदा कर्जत, श्रीगोंदे
आणि आष्टी तालुक्याला होत आहे. सीना धरण भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी
वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या