Ticker

6/Breaking/ticker-posts

आयटी पार्कमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं काँगेस नेत्याच्या अंगलट; पाहा काय घडलं?

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 

अहमदनगर: शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांना येथील आयटी पार्कमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे चांगलेच महागात पडले. त्यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मतदारांना दिलेले आश्वासन खोटे ठरविण्यासाठी काळे आयटी पार्क मध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी व कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याची फिर्याद तेथील महिला कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानुसार काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. नगरला आयटी पार्क सुरू करून अनेकांना नोकरी मिळून दिल्याचा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. तो खोटा असल्याचे दाखवून देण्यासाठी काळे यांनी हा प्रयत्न केला. आयटी पार्कमध्ये जाऊन पाहणी केली, चित्रीकरण केले, कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आमदार जगताप यांचा दावा खोटा असल्याचे प्रसारमाध्यमसमोर जाहीर आरोप केले.

मधल्या काळात आयटी पार्कमधील कंपन्यात काम करणाऱ्या काही महिलांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. त्यांनी म्हटले आहे की, काळे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसी येथील आयटी पार्कला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील बजाज फायनान्स, बजाज फिन्सर कंपनीचे कॉल सेंटर इथे बळजबरीने प्रवेश केला. तेथे महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. कार्यालयातील महिलांना दमदाटी करत मी काँग्रेस पक्षाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्या नादी लागू नका, सगळे धंदे बंद करा, मी तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात काळे व कार्यकर्त्यांविरुद्ध बळजबरीने खासगी जागेत प्रवेश करणे, विनयभंग करणे, धमकावलयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या