Ticker

6/Breaking/ticker-posts

अफगाणिस्तान: तालिबान आज सरकार स्थापन करणार?; अखुनझादा असणार सर्वोच्च नेते

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: दोन दशकानंतर अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेले तालिबानी आज सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. आज शुक्रवारच्या नमाजानंतर तालिबान सरकार स्थापनेबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. तालिबान आपला मोठा धार्मिक नेता अखुनझादा याला सर्वोच्च नेता म्हणून घोषित करणार आहे. मुल्ला अखुनझादा हा अनेक वर्षांपासून अज्ञातवासात असून सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळेस दिसला आहे.

सत्तास्थापनेसाठी तालिबानमधील अंतर्गत चर्चा पूर्ण झाली असून, मंत्रिमंडळ स्थापनेबाबतही अंतिम निर्णय झाला आहे, अशी माहिती तालिबानच्या माहिती व संस्कृती विभागाचे अधिकारी मुफ्ती इनामउल्लाह समनगनी यांनी गुरुवारी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या