Ticker

6/Breaking/ticker-posts

सर्व कार्यक्रमांना गर्दी चालते, गणेशोत्सवालाच का नाही?; राज ठाकरे


 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणेः 'सरकार किंवा त्या त्या पक्षाच्या कार्यक्रमाला गर्दी चालते. गणेशोत्सव अथवा दहीहंडीला गर्दी चालत नाही. नियम सर्वांसाठी सारखाच असायला हवं. नेत्यांच्या सभांना गर्दी चालते, गणेशोत्सव, दहीहंडीला का नाही?,' असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

'राज्य सरकारला सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नकोत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे,' असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी मनसेदेखील सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे हे सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल पुण्यातील पदधिकाऱ्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबतही संवाद साधला.

'सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकारलाच नको आहेत. हे सरकारच्या फायद्याचे असेल. असं नको व्हायला जर निवडणुका झाल्या नाहीत तर महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय पुढे करुन सरकार काही तरी साध्य करतेय. जनगणना व बाकी सगळ्या गोष्टी झाल्यावर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही,' असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

' करोनाच्या काळात व या लॉकडाऊनमध्ये सर्वच सरकारांच्या लक्षात आलं की जे चाललंय ते बरं चाललंय. सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही, आंदोलन करायचं नाही. हे सर्व सरकारच्या लक्षात आलंय हे बरं चाललंय सरकारांचं. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या