Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रसंत भगवान बाबांची १२५ वी जयंती भक्ताविणा साजरी..!

 महंत डॉ नामदेव शास्त्री यांच्या हस्ते समाधी पुजन 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन शासनाने धार्मिक स्थळ बंद ठेवल्याने   श्री क्षेत्र भगवान गडावर संत भगवान बाबाची  शतकोत्तर रौप्य महोत्सवीजयंती  भक्तविना साध्या पध्दतीने  साजरी  करावी  लागली.

   श्रीक्षेत्र भगवान गडावर काल वारकरी  संप्रदायाचे थोर उपासक संत भगवान बाबा यांच्या १२५ व्या जयंती  निमित्त संत भगवान बाबांच्या समाधीचे पुजन व महाभिषक भगवानगडाचे महंत न्यायाचार्य  डॉ .नामदेव शास्त्री यांच्या हस्ते झाले .कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन शासनाने धार्मिक स्थळ बंद ठेवल्याने संत भगवान बाबा भक्ताना समाधी दर्शनाचा लाभ घेता आला नाही, मात्र  भगवानगड ट्रस्टच्या वतीने साध्या पदधतीने जयंती साजरी केली .फक्त भगवानगडावरील सेवेकरी व ज्ञानेश्वरी विद्यापिठातील आचार्य व विद्यार्थी   यांच्या उपस्थिती मध्ये  गडाचे महंत डॉ नामदेव शास्त्री यांच्या हस्ते  भगवान बाबा समाधी व पाडुंरगाचा महाभिषक झाला .समाधी पुजनानतंर भगवान बाबाची आरती झाली .

    संत भगवानबाबांचा जन्म इस १८९६ साली श्रावण वध्द पंचमी रोजी सावरगाव घाट ता . पाटोदा जि बिड येथे झाला वयाच्या ११व्या वर्षी त्यांच्या आजोळी लोणी या गावात नारायणगडाचे महंत माणीक बाबाची भेट झाली व भगवानबाबाच्या आईकडे भगवान बाबाची मागणी केली व नारायणगडावर घेवुन गेले बाबाचे लहाणपणी आबा हे नाव होते. माणीक बाबानी आबाचे भगवान हे नामकरण केले भगवानगड स्थापनेच्या आधी संत भगवान बाबा  नारायणगड येथे होते. परंतू नारायणगडावर माणीक बाबाच्या नंतर जास्त वादाविवाद झाले .त्यानतंर नारायणगडाचा त्याग केला व हिमालयात जाण्याचा  निर्णय घेतला .खरवंडी कासारचे बाजीराव पाटील व भक्ताच्या आग्रहामुळे. खरवंडी कासार जवळ  धौम्यगड  येथे भगवानबाबानी इस १९५१मध्ये दसऱ्याच्या मुहर्तावर गडाची स्थापना.केली तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांनी या गडाचे भगवान गड हे नामकरण केले. भगवान बाबानी किर्तन दिंडी च्या माध्यमातून माणूस अधंश्रध्दा मुक्त करण्याचे कार्य केले इस १९ जानेवारी १९६५ ला भगवान बाबा अनंतात विलीन झाले. इस १९२०पासुनच पढंपुर दिडीं सुरू केली. भगवान गडावर महीना एकादशीवारी ,दसरा , भगवानबाबा पुण्यातिथी , भगवान बाबाची जयंती या दिवशी महाराष्ट्रातून भगवानबाबा भक्त गडावर येवृन बाबाच्या समाधीचे दर्शन घेतात.

मात्र कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन शासनाने धार्मिक स्थळ बंद ठेवली आहेत.  धार्मिक कार्यक्रमावर बंदी असून  शासणाने घालुन दिलेल्या नियमाचे लोक कल्याणासाठीच भगवान गड ट्रस्ट पालन करत आहे .  शासनाला सहकार्य करत आहे .यापुर्वी ही पुण्यतिथी सोहळा साध्या पधतीने साजरा झाला. गुरुपोर्णीमा  व  महीना एकादशी वारी ,आषाढी ,कार्तिकी तसेच पालखी सोहळा व   वार्षीक नारळी सप्ताह असे भगवान गडाचे महत्वाचे कार्यक्रम ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन भक्ताविना साजरे केले  असे महंत डॉ . नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या