Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासार ते नांदेड लोहा महामार्गाचे काम 'संथ' पण 'अपघात' मात्र गतीने...

 'काम चालु- रस्ता बंद' चे फलक नसल्यानेअपघाताचे प्रमाण वाढले 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा  यांच्या मधील अतंर कमी व्हावे  या दृष्टीने खरवंडी कासार पासुन म्हणजे  राज्य महामार्ग ६१ वरून खरवंडी कासार- नवगण राजुरी -बीड -नांदेड -लोहा राष्ट्रीय महामार्ग क्र ७५२ ( २ )  महामार्गाला प्रशासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली दोन वर्षापासुन  संथ गतीने हे काम सुरू आहे काम चालु असलेल्या ठिकाणी कुठेही काम चालु रस्ता बंद चे फलक नाहीत खोदकाम केलेल्या रस्त्याच्या बाजुला रेडीयम पटया नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे आतापर्यंत ठेकेदाराच्या हलगर्जी पणा मुळे व अधिकाऱ्याच्या दुर्लक्षा मुळे अनेक जणाचे हकनाक बळी ही गेले आहेत .

अहमदनगर ते बीड हे शहर या मार्गाने सर्वात कमी अतंराने जोडले जातात खरवंडी कासार   नांदेड लोहा   या महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले पहिल्या टप्प्यामध्ये खरवंडी कासार ते नवगण राजुरी असे प्रारंभ करण्यात आला  असून या महामार्ग मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या  त्या  शेतकऱ्यांना शेत जमिनीचा मावेजा देणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते परंतु या महामार्गाचे काम मावेजा रखडल्याने अत्यंत संथ गतीने सुरू झाले  यामुळे याचा सर्वाधिक फटका या रस्त्यावरील शेतकऱ्यांना व प्रवाशांना बसला आहे.

खरवंडी कासार ते नवगण राजुरी असे एकूण ३६ किलोमीटरचे रस्ता रुंदीकरणाचे व सिमेंट कॉकटीकरणाचे  काम झाले आहे मात्र ठिकठिकाणी पुल व रस्ता काम अर्धवट असल्याने वाहन चालकाना कसरत करावी लागते फलक नसल्याने पुढे  रस्ता खराब  आहे हे समजत नसल्याने अपघात होत आहेत दोन वेगवेगळ्या कंपनी   मार्फत हे काम प्रगतीपथावर नेले जात आहे परंतु या मार्गावर सुरूवातीस जुण्या  भूसंपादनाच्या आधारावर महामार्गाचे काम पार पडत असल्याने नव्याने शेतकऱ्यांच्या महामार्गात जाणाऱ्या शेत जमिनी बाबत प्रशासनाकडून पाऊल उचलत निर्णय न झाल्याने  शेतकऱ्यानी काम बंद पाडले होते .

त्यानतंर भुसपांदना संदर्भात अधीसुचना प्रसिद्ध होऊन  दावे हरकती माघीतल्या नतंर कामाने गती घेतली मात्र  शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत शेत जमिनीचा मावेजा प्राप्त झालेला नाही यामुळे या अंतरातील शेतकऱ्यांकडून हे काम  बर्‍याचदा बंद करण्यात आले होते त्यानतंर ठिकठिकाणी  ठेकेदारानी खोदकाम करत अर्धवट काम ठेवत संथ गतीने काम सुरू ठेवले खोदकाम केलेल्या ठिकाणी फलक नाहीत रस्त्याच्या एका बाजुने कॉक्रटीकरण झाले त्यातील लोखंडी गज दुसऱ्या बाजुने बाहेर असतानाही रेडीअम पट्या नसल्याने गज लागुन अपघात होत आहेत खरवंडी कासार चौफुली जवळील पुला जवळतर दररोज अपघात होतो अधीकाऱ्याचे दुर्लक्ष तर ठेकेदाराचा हलगर्जी पणा यामुळे वाहनधारकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .

 अपघाताचे  वाढते प्रमाण चिंताजनक..

गेल्या दोन वर्षापासुन या रस्त्याचे धिम्या गतीने काम चालु असुण अचाणक पणे कोठेही खोदकाम, खडीकरण व क्रॉक्रटीकरण  होते व काम चालु रस्ता बंदचे फलख हि लावलेले नसतात यामुळे यापुर्वी बरेच अपघात झाले त्यामध्ये काही व्यक्तीला जिव ही गमवावा लागला आहे . दिवसेदिवस दिवस हे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या