Ticker

6/Breaking/ticker-posts

‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ नाशकात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नाशिक: आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालवितांना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज जिल्ह्यात नो हेल्मेट, नो पेट्रोलही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. सर सलामत तो हेल्मेट पचासयानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदभावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नो हेल्मेट नो पेट्रोलमोहिम शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले- श्रींगी यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पेट्रोल डिलर संघटनेचे अधिकारी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शहरात ७८२ अपघातात ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. अशा अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा

नो हेल्मेट नो पेट्रोलहा उपक्रम स्तुत्य असून, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांचा जीव वाचविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दीष्ट आहे. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. नागरीकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, अशी भावना पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षत घेवून, सर्व पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना देखील यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नो हेल्मेट नो पेट्रोलही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू: पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय नागरीकांच्या हितासाठी शासन योजना व मोहिम राबवित असते. त्या अनुषंगानेच जिल्ह्यात नो हेल्मेट नो पेट्रोलही मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप व शहर पोलिस यांच्या संमतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचे प्राधन्य देण्यात येणार असून, ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी नो हेल्मेट नो पेट्रोलया मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या