लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
संगमनेर: राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी असतानाही , तसेच करोना प्रतिबंधक निर्बंधही लागू असताना संगमनेर तालुक्यातील
दरेवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यत आयोजित
करण्यात आली.संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे स्वातंत्र्यदिनी भल्या सकाळीच ही
शर्यत पार पडली. पोलिस आणि प्रशासन स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांत व्यस्त
असताना ग्रामस्थांनी ही शर्यत भरविली. मात्र, ही शर्यत आयोजकांना चांगलीच भोवली असून या प्रकरणी एकूण ४७ जणांवर घारगाव
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या
प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे आयोजित करण्यात
आलेल्या या शर्यतीत संगमनेर, पारनेर आणि शेजारील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बैलगाड्या यात
सहभागी झाल्या होत्या. या शर्यतीत सहभागी होण्यासाठी जात असलेली ओतूर येथून येणारी
एक बैलगाडी पकडून पोलिसांनी कारवाई केली.
सर्व नियम सर्व नियम धाब्यावरून बसवत
सुमारे पन्नास बैलगाड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. शर्यत पाहण्यासाठी
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी गर्दीही केली होती. एकीकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी
उठविण्यासाठी आंदोलने होत आहेत, तर दुसरीकडे यावर निर्णय होण्याआगोदरच शर्यतीही भरविल्या जात आहेत.
पुणे
जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अशा शर्यती भरविण्याचे प्रमाण अधिक आहे.
पोलिसांनी बोलेरो गाडीसह एक बैलजोडी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी
आतापर्यंत एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. बैलाला टोचण्याचे खिळे आणि
बांबूची काठी आदि साहित्या पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा
पोलिस कसून शोध घेत आहेत.
0 टिप्पण्या