लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा: दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला
भिडणाऱ्या किंमती आणि त्यांच्या वापरापासून जैव पर्यावरणाची होणारी अपरिमित होणारी
हानी टाळण्यासाठी बायोइंधन निमिर्तीला सरकारकडून प्राधान्य देण्यात येत आहे. वाहन
निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून सीएनजी वाहनांची निर्मिती केली जात आहे.त्यामुळे
भविष्यामध्ये बायोइंधन ही काळाजी गरज बनणार आहे.
शनिवारी
दि.२१ ऑगस्ट रोजी तालुक्यातील कोळगाव येथे या प्रकल्पाच्या फलकाचे अनावरण करून
बायोइंधन निर्मितीची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. प्रचेता क्लीनफ्लुअल प्रा.ली व शिधा
फ्रार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
ग्रामीण भागात जनावरा चारा म्हणून वापरण्यात येणाऱ्या हत्ती गवतापासून (नेपीयर)
आता सीएनजी इंधन निर्मिती होणार आहे. कंपनीकडून हे हत्ती गवत एक हजार रूपये प्रती
टन या भावाप्रमाणे विकत घेण्यात येणार असून शेतकऱ्यांना सभासदही होता येणार आहे.
शेतकऱ्यांना शेअर्स फी २५० रूपये व सभासद फी २५० रूपये असे एकूण ५००रूपये देऊन
क्षमतेनुसार शेअर विकत घेता येणार आहेत.
सभासद
शेतकऱ्यांना हत्ती गवताचे बियाणे आणि सेंद्रिय खत देखील पुरवले जाणार आहेत. यानंतर
पीक काढणीयोग्य झाल्यावर कंपनीमार्फत विकत घेतले जाईल. श्रीगोंदा तालुक्यातून दहा
हजार सभासदांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून साडेतीन हजार सभासदांची नोंदणी पुर्ण
झाल्याची माहिती कंपनीचे प्रचेता क्लीन फ्युअलचे अधिकारी हेमंत उपारे यांनी दिली.
या
कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी अधिकारी विलास नवले , एमसिएल कंपनीचे अधिकारी रणजित दातीर ,पं.स मा.सभापती पुरूषोत्तम लगड ,मा.सरपंच हेमंत नलगे
, मा.उपसरपंच नितीन नलगे , मा.उपसभापती
बाळासाहेब नलगे ,डि.एल लगड , जिल्हा
बँक मा.संचालक प्रेमकाका भोयटे ,दामुकाका साके , दादासाहेब साबळे , बाळासाहेब मोहारे ,मयुर पंदरकर , कोळगावचे उपसरपंच अमित लगड , तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या