Ticker

6/Breaking/ticker-posts

तहसीलदार ज्योती देवरे यांना न्याय मिळावा ; संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

*सात दिवसात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करवी

* करून पारदर्शक चौकशी व्हावी अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा

*23 रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून करणार निषेध


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर : पारनेर तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे यांची स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती याविषयी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती सात दिवसाच्या स्थापन करून प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून तहसीलदार ज्योती देवरे यांना न्याय देण्यात यावा यासाठी चे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

याबाबत संघटनेने म्हटले आहे की पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची महिला अधिकारी म्हणून कुचंबणा व अवहेलना होत असल्याचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून कामकाजा दरम्यान प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडथळा निर्माण केला जात असल्याने अशा प्रकाराची एखाद्या क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची कुचंबणा व अवहेलना होण्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना तीव्र निषेध व्यक्त करत आहे.

तसेच एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यां विरोधात मर्जीने कामे न केल्याने तसेच त्यांचेवर वचक निर्माण करण्याचे अनुषंगाने त्यांचेवर दबाव टाकून वरिष्ठ मार्फत पाहिजेत तशी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव शासनास पाठवल्याचे दिसून येते तसेच इतर लोकांकडून तक्रारी लिहून घेऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे त्यांचेवर खोट्या तक्रारी करून कारवाईचा धाक दाखवून त्यांच्यावर प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने वरिष्ठांना कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यास बाध्य केल्याचे दिसून येते ही निश्चितच गंभीर बाब आहे. यापूर्वीच्या नजीकच्या काळात अशा प्रकारे अनेक महिला अधिकारी व इतर अधिकारी यांच्या विरोधात केवळ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने कामे न केल्यामुळे दबाव टाकून वरिष्ठां मार्फत पाहिजेत तशी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निश्चितच महिला अधिकारी व इतर अधिकारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे.

 सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकारी यांचा समावेश असलेली स्वतंत्र समिती तत्काळ स्थापन करून या समितीमार्फत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे या प्रकरणी चौकशी पारदर्शक न झाल्यास संघटनेस आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल या घटनेच्या निषेधार्थ 23 रोजी सकाळी अकरा वाजता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येऊन काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी घेतला आहे तरी सदर प्रकरणी राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती सात दिवसाच्या आत स्थापन करून प्रकरणाची पारदर्शक चौकशी तात्काळ पूर्ण करून सदर तहसीलदार ज्योती देवरे यांना न्याय देण्यात यावा  सकाळ समिती स्थापन करून न्याय न दिल्यास संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने पत्रकाद्वारे दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या