Ticker

6/Breaking/ticker-posts

तहसीलदार देवरेंचा भ्रष्टाचार: वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी बोलेन - हजारे

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर :   जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात ६ पानी अहवालाच नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविलेला असुन देवरे यांच्या भ्रष्टाचारांची कुंडली आमदार निलेश लंके यांनी शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दाखविली आहे.जवळपास १ तास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मध्ये चर्चा झाली असून भ्रष्टाचाराचे पुरावे इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.

 पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे तालुक्यासह राज्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके व महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी शनिवारी सकाळी राळेगणसिद्धीत जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास १ तासाहून अधिक वेळ चर्चा झाली.

 

 यावेळी आमदार लंके यांनी हजारे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर केलेल्या अहवालाची प्रत दाखवत सविस्तर चर्चा केली. तहसिलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात काम करत असताना सामान्य जनतेची पिळवणूक करत कसा भ्रष्टाचार केला याचीही माहिती दिली. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये तहसिलदार म्हणून काम करताना त्यांचे काम कसे होते याबाबतची माहिती लंके यांनी यावेळी हजारे यांना दिली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, निलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, दत्ता आवरी आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्र्यांशी बोलेन-अण्णा हजारे

तहसिलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यासबंधीच्या बातमी टीव्हीवर पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी बोललो आहे. अशा गोष्टींमुळे तालुक्याची बदनामी होत आहे. त्यामुळे असे अधिकारी तालुक्याला नको आहेत. वेळ पडली तरी मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करील असेही हजारे यावेळी म्हणाले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या