लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
एकीकडे आमदार पडळकर शर्यतीच्या आयोजनावर
ठाम असले तरी दुसरीकडे शर्यत होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. झरे
परिसरात संचारबंदी जाहीर केली असून, संपूर्ण गावाला पोलिसांनी वेढा दिला आहे. यामुळे झरे गावाची स्थिती
पोलिसांनी अफगानिस्तानसारखी केल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.
झरे परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी
शर्यतीचे आयोजन केल्यापासून जिल्ह्यात पोलिस प्रशासन आणि आमदार पडळकर यांच्यात
संघर्ष निर्माण झाला आहे. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी
झरे परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
शर्यत स्थळावरही पोलीस ठाण मांडून आहेत.
झरे गावात जाणारे सर्व मार्ग बंद केले असून,
गावाबाहेरील व्यक्तींना आत प्रवेश दिला जात नाही. यानंतरही
गनिमीकाव्याने शर्यत होणारच अशी चर्चा झरे परिसरात सुरू आहे. पोलिसांनी कितीही
बळाचा वापर केला तरी शर्यत पार पडेल, असे सांगत आमदार पडळकर
यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.
0 टिप्पण्या