Ticker

6/Breaking/ticker-posts

चिंता वाढली ! राज्यात डेल्टा प्लस वाढतोय; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण आढळल्याने खळबळ

 

*जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सहा नवे रुग्ण आढळले, एकूण संख्या १३ वर

*ठाण्यातही आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४ रुग्ण,

*राज्यात करोना विषाणूच्या नव्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे एकूण ४९ रुग्ण.

*न घाबरता वेळीच रुग्णालयात जाणे- आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांचे आवाहन.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: राज्यात करोना विषाणूच्या नव्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटचे आतापर्यंत ४५ रुग्ण समोर आले आहेत. यात यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यानंतर आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नवीन ६ रुग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. जळगाव पाठोपाठ आता ठाण्यातही या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हयातील करोना रुग्णवाढीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश मिळत असताना आता करोनाचा या नव्या व्हेरिएंटने ठाण्यात शिरकाव केल्याने वैद्यकीय यंत्रणेसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

महानगरपालिकांचा विचार करता ठाणे महापालिका क्षेत्रात या नव्या विषाणूचे ३ तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ रुग्ण आढळला आहे. या रुग्णांमध्ये २५ वर्षांखालील २ रुग्ण, तर ५६ वर्षांखालील २ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.


महाराष्ट्रात २१ जून रोजी प्रथमच करोना विषाणूच्या नव्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटचे २१ रुग्ण समोर आले होते. जळगाव जिल्ह्यातील ७ रुग्णांचा त्यात समावेश होता. जळगाव जिल्ह्यात आढळलेले सातही रुग्ण एकाच गावातील होते. विशेष म्हणजे त्यावेळी आढळेले सातही रुग्ण त्यांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच ठणठणीत बरे झाले होते. जिल्हाभरात पुन्हा डेल्टा प्लसचे ६ बाधित रुग्ण जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये निष्पन्न झाले आहेत. हे सहा रुग्ण वेगवेगळ्या तालुक्यातील असून विशेषत: ग्रामीण भागातील आहेत. या सहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते करोनातून बरे झालेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यात एकूण ४५ डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता ठाणे जिल्ह्यात आणखी ४ रुग्ण आढळल्याने ही संख्या आता ४९ वर जाऊन पोहोचली आहे. यात २९ पुरूष आणि २० महिलांचा समावेश आहे. ठाण्याव्यतिरिक्त राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि रत्नागिरीत आतापर्यंत डेल्टा प्लसचे व्हेरिएंट आढळले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या