Ticker

6/Breaking/ticker-posts

यंदा कर्तव्य आहे, बोहल्यावर चढणार आलिया- रणबीर ?

 

*आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या ४ वर्षांपासून एकमेकांना करत आहेत डेट

*यंदा आलिया आणि रणबीर बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा

*अभिनेत्री लारा दत्तानं अलिया- रणबीरच्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट् मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचं हे नातं त्यांनी सर्वांसमोर मान्यही केलं आहे. त्यामुळे हे दोघंही लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना मागच्या बऱ्याच काळापासून आहे. मागच्या दोन वर्षांपासून तर या दोघांच्या लग्नाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. पण आता यंदा आलिया आणि रणबीर बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. इतरांचं माहीत नाही पण अभिनेत्री लारा दत्ताला मात्र असंच वाटतं.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लारा दत्तानं आलिया- रणबीरच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. हे दोघंही यावर्षी लग्न करतील असं लाराचं मत आहे. ती म्हणाली, 'मला वाटतं ते दोघंही यावर्षी लग्न करतील. मी आता जुन्या पीढीतली झाले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये कोण कोणाला डेट करत आहे याची फारशी माहिती मला नाही. तसेच अनेक कपल्सबाबत ते सध्या एकमेकांसोबत आहेत की नाही हे देखील मला माहीत नाही.'

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मागच्या वर्षीच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकतील असं अनेकांना वाटत होतं. पण करोना व्हायरसमुळे या दोघांच्या लग्नाचा प्लान पुढे ढकलण्यात आला. एका मुलाखतीमध्ये रणबीरनं हे देखील मान्य केलं होतं की, जर करोना आला नसता तर त्याचं आलियाशी लग्न झालेलं असतं. लवकरच ही रिअल लाइफ जोडी मोठ्या पडद्यावरही पहिल्यादाच एकत्र झळकणार आहे. हे दोघं अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या