Ticker

6/Breaking/ticker-posts

'गुम है किसी के प्यार मे' मध्ये रेखा यांची एण्ट्री? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

'गुम है किसी के प्यार में' च्या महासप्ताहाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

मालिकेत रेखा यांचा असू शकतो कॅमिओ

रेखा यांच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई- फार कमी कालावधीत छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवणारा कार्यक्रम ''गुम है किसी के प्यार में' प्रेक्षकांचा अत्यंत आवडता आहे. प्रेक्षकांना बांधून ठेवणारी मालिकेची कथा, कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय आणि वेळोवेळी मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. सई आणि विराट यांची प्रेमकहाणी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पुढे दाखवण्यात येणाऱ्या महासप्ताहाच्या भागात आणखी मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा देखील कार्यक्रमात झळकण्याची शक्यता आहे.तीन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि आपला अभिनय, बोलके डोळे यांच्या जोरावर चाहत्यांच्या मनात जागा मिळवणाऱ्या अभिनेत्री रेखा 'गुम है किसी के प्यार मे' मालिकेत छोटीशी भूमिका साकारू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. नुकताच रेखा यांचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमधील त्यांची उपस्थिती चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रोमोला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या कथेमध्ये असलेले निरनिराळे ट्विस्ट आणि रेखा यांचा प्रोमो यांमुळे मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रोमोला मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून मालिकेचे निर्माते रेखा यांची छोटीशी भूमिका मालिकेत दाखवण्याचा विचार करत आहेत.

तर दुसरीकडे 'गुम है किसी के प्यार में' च्या महासप्ताहाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सई आणि विराटबाबत चाहत्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. सम्राटाच्या येण्याने पुन्हा एकदा विराट आणि सईच्या प्रेमाला वेगळं वळण मिळेल? विराट कधी सईला त्याच्या प्रेमाबद्दल सांगू शकेल? असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांसमोर आहेत. पुढे मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतात हे पाहणं उत्कंठावर्धक आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या