Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबई- पुणे सारखी नगरची बाजारपेठही सुरू करा : आमदार संग्राम जगताप



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर : गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोणाच्या महाभयंकर संकट काळात केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनचा वापर करुन. कोरोणा संसर्ग विषाणू रोखण्यासाठी मदत झाली . परंतु व्यापारीकरण आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांना धीर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तरी मुंबई-पुणे येथे काल पासून सरकारने घोषणा करून बाजारपेठा खुल्या केले आहे. त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ खुल्या कराव्यात. अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.


जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक कारणासाठी 7 ते 4 ही वेळे दिली आहे .तरी आता ११ ते ६ वेळेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून अर्थकारण गतिमान होऊन व्यवसायाला चालना मिळेल . शहरातील उद्योजकांवर हजारो कामगारचे कुटुंबंचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी सरकारने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा . तसेच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे आमदार संग्राम जगताप व व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा व शनिवार रविवार सुद्धा दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी केली.

यावेळी वेळी व्यापारी संतोष बोरा म्हणाले की कोरोनाच्या महासंकट काळामळे व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. नगर शहरातील बाजारपेठावर हजारो कुटुंबंचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. वारंवार लाॅकडॉन मुळे बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील ग्राहक या बंदमुळे इतर जिल्ह्यांमध्ये खरेदीसाठी जाऊ लागला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय साठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.


जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची आमदार संग्राम जगताप व शहरातील व्यापारी संघटनांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यावेळी व्यापारी सुभाष कायगावकर. माजी नगरसेवक संजय चोपडा. संतोष बोरा. सचिन मुथा. उमेश बोरा. प्रेमराज पोखरणा. रवी गुजराती. राजेंद्र बोथरा. नाना बोजा आदी उपस्थित होते.

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या