Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव अॅट्रॉसिटी व विनभंगप्रकरणी नगरसेवकासह चौघांना अटकपूर्व जमीन मंजूर

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले मात्र नोकरी लावली नाही. घेतलेल्या पैश्याची मागणी केली असता मागासवर्गीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी  अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या शेवगावचे नगरसेवक कमलेश गांधीसह चार जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता , मात्र आज सोमवारी या चौघांनाही अहमदनगर न्यायालयात अटकपूर्व जमीन मंजूर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोल्या आठवड्यात शेवगाव येथील एका महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ललिता तापडीया व कमलेश गांधी यांनी माझ्या पतीस अर्बन बँकेत नोकरीला लावून देतो.असे म्हणून माझ्या सासूकडे १० लाख रुपयांची मागणी केली. त्यातील पाच लाख ५० हजार रुपये रोख घेतले होते. उर्वरीत रक्कमेसाठी बँक आँफ महाराष्ट्राचे तीन कोरे धनादेश घेतले होते. त्यानंतर माझे पती यांना नोकरीस लावून न दिल्याने आमच्यात वाद झाले. त्यानंतर ललिता तापडीया हीने माझ्या पतीविरुध्द धनादेश न वटल्याचा गुन्हा न्यायालयात दाखल केला.

 दि.१५ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान मी घरात एकटीच असतांना कमलेश गांधी रा. शास्त्रीनगर शेवगाव, ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी ( सर्व रा देशपांडे गल्ली शेवगाव ) यांनी माझ्या घरी येवून मला जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्हाला जास्त झाले तुमचा खुन करु असे कमलेश गांधी, शरद जोशी, जगदीश तापडीया म्हणू लागले. त्यावर ललिता तापडीया हीने माझ्या केसाला धरुन ओढत माझ्या तोंडावर चापट मारुन आमच्या नादाला लागू नकोस असे म्हणत आम्ही घरासकट तुम्हाला जाळून टाकू तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. व जगदीश तापडीया व गांधी यांनी माझ्या छातीवरील साडीचा पदर ओढला व माझी साडी फेडण्याचा प्रयत्न करुन मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याने पोलिसात तक्रार देऊनही गुन्हा दाखल न झाल्याने पिडीत महिला व तिचे कुटूंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर उपोषणास केले . 

पोलिसांनी  उपोषणाची दखल घेवून नगरसेवक कमलेश गांधी, ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी यांच्याविरुध्द अनुसुचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१) तसेच भादवि कलम ४५२, ३५४, ३२३,५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता .

त्यासंदर्भात आरोपींनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात दाद मागत अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमुर्ति शेटे यांच्या समोर आज सोमवार या अर्जावर सुनावणी झाली .  युक्तिवाद होऊन नगरसेवक  कमलेश गांधीसह ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी या चौघांना अहमदनगर न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला  आहे . त्यांचा वतीने अॅड महेश तवले यांनी काम पाहिले .

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या