Ticker

6/Breaking/ticker-posts

आढावा बैठकीत भाजप आमदाराला नो एन्ट्रि ; भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा..

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


पाथर्डी :अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याचे पडसाद शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत उमटले. प्रशासकीय बैठक असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारला. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बैठकीत बसलेले होते. त्यामुळे चिडलेल्या राजळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतली. शेवटी त्यांना आत प्रवेश देण्यात आला. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत पालकमंत्र्यांसमोरच ठिय्या दिला.


गेल्या काही दिवसांपासून शेवगाव-पाथर्डी तालुक्यात आमदार राजळे आणि राष्ट्रवादीचे नेते अड. प्रताप ढाकणे यांच्यात आरोपप्रात्यारोप सुरू आहेत. ढाकणे यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही यात उतले आहेत. तर दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन परतल्यानंतर आमदार राजळेही मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी विकास कामांची भूमिपूजने आणि उद्घाटनांचा सपाटा सुरू केला आहे. तर ढाकणे यांच्याकडून विकास न झाल्याचा आरोप केला जात असून कामे पाहण्यासाठी येण्याचे जाहीर आव्हान आमदार राजळे यांच्याकडून देण्यात आले आहे.

हा संर्घष सुरू असतानाच अनेक दिवसांनंतर जिल्ह्यात आलेले पालकंमत्री मुश्रीफ शनिवारी पाथर्डीला गेले. तेथे करोना परिस्थिती आणि एकूणच कामाकाजाच्या आढाव्याची बैठक त्यांनी घेतली. दोन्ही पक्षांतील वादाचे पडसाद या ठिकाणीही दिसून आले. मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठकीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. त्याचवेळी भाजपचे काही पदाधिकारी तेथे आले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना बैठकीच्या सभागृहात जाऊ दिले नाही. ही फक्त अधिकाऱ्यांची बैठक असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याची माहिती आमदार राजळे यांना मिळताच त्याही तेथे आल्या. त्यावेळी बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते होते. असे असताना आमदार आणि भाजपच्या अन्य लोकप्रतिनिधींनी का अडविता, असा जाब विचारून आमदार राजळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून आमदार राजळे यांना आत सोडले. मात्र, सोबतच्या पदाधिकाऱ्यांनाही आत येऊ द्यावे, असे म्हणत राजळे सर्वांना घेऊन आतमध्ये गेल्या. तेव्हा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या शेजारी बससेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची खुर्ची रिकामी करून आमदार राजळे यांना तेथे बसविण्यात आले. यावरही भाजपच्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पालकमंत्र्यासमोर जमिनीवीर ठिय्या दिला. सभापती सुनीता दौड, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, भाजप तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या