Ticker

6/Breaking/ticker-posts

काबूल: धक्कादायक ! सी-१७ विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष 

लोकनेता  न्यूजऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: काबूल विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या अमेरिकेच्या सी-१७ विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी काबूलहून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान कतारमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. अमेरिकन हवाई दलाकडून याचा तपास सुरू आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर हजारो अफगाण नागरिकांनी देशाबाहेर पडण्यासाठीची धडपड सुरू केली होती. विमानांमध्ये जाण्यासाठी चेंगराचेंगरीदेखील झाली. या दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही अफगाण नागरिक अमेरिकेच्या सी-१७ या विमानाला लटकत असल्याचे दिसून आले. त्याच दरम्यान काही अफगाण नागरीक विमानाच्या चाकांवर बसले असल्याचा दावा करण्यात आला होता.

अमेरिकन हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळावर सी-१७ मधून उतरताच शेकडो अफगाण नागरिकांनी विमानाला घेरले. अराजकसदृष्य स्थिती पाहता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसले. त्यानंतर सी-१७ च्या चालक दलाने सुरक्षितेच्या कारणास्तव विमानाचे लवकरात लवकर उड्डाण घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत ३२०० अमेरिकन नागरिकांची सुटका करण्याात आली आहे. अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या