Ticker

6/Breaking/ticker-posts

'भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण'



 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. या यात्रांना गर्दी होत असल्यामुळं करोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ' भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला ज्या पद्धतीनं गर्दी होतेय, ते चिंताजनक आहे. अशा यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर नाही ना, अशी शंका येणं स्वाभाविक आहे,' असं संजय राऊत म्हणाले.


देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजप नेत्यांकडून त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राऊत यांनी भाजपच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. ' हे एक सर्वेक्षण आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे पहिल्या पाचमध्ये आहेत. भाजपचा एकही मुख्यमंत्री त्यात नाही. मेरा नंबर कम आयेगा... म्हणत भाजपचे मुख्यमंत्री वाट बघत बसलेत. त्यामुळं भाजपला त्या सर्वेक्षणावर विश्वास बसणार नाही हे साहजिक आहे,' असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

उद्धव ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यातील सरकार पडावं म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश नाही. याचा अर्थ जनतेला विकास, न्याय हवा आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणारं सरकार हवं आहे. केवळ भावनिक घोषणा करून किंवा एखाद्याची बदनामी करून कोणी लोकप्रिय ठरू शकत नाही हेच यातून सिद्ध झालंय,' असा टोलाही राष्ट्रवादीनं हाणला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या