Ticker

6/Breaking/ticker-posts

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण : काँग्रेस नेते शशी थरुर यांना मोठा दिलासा   


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील चर्चित सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळालाय. दिल्लीच्या एका न्यायालयानं शशी थरूर यांना आरोपमुक्त केलंय. सुनंदा पुष्कर या शशी थरुर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.

शशी थरूर यांनी सुनंदाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप, दिल्ली पोलिसांकडून शशी थरूर यांच्यावर करण्यात आला होता. घरगुती भांडणांमुळे सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असे आरोप करण्यात आले होते.

तर दुसरीकडे, माझ्यावरील सर्व आरोप हे निराधार असून मला नाहक बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचं म्हणत शशी थरूर आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले होते.

१७ जानेवारी २०१४ रोजी चाणक्यपुरी मधील पंचतारांकित हॉटेल लीला पॅलेसमधील खोली क्रमांक ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. संशयास्पद परिस्थितीत झालेल्या या मृत्यूनं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या तपासणीसाठी एसआयटीही नियुक्त करण्यात आली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या