Ticker

6/Breaking/ticker-posts

आयुषी खेडकरचा पाथर्डीकरांना सार्थ अभिमान..- माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी :खडतर परिश्रम घेऊन आयुषी खेडकर हिने वंजारी समाजातील देशातील वायुसेनेतील पहीली महीला वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे.तिच्या ह्या कामगिरीचा अभिमान सर्वांना आहे. आयुषीच्या आयुष्यातील कामाचा आलेख नेमही उंचावत जावो. पाथर्डी ही अधिकारी निर्माण करणारी खाण कायम राहीलेली आहे. आपल्या मुलांच्या हातुन देशाची सेवा घडते हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी केले.

 शहरातील संस्कार भवन येथे एकलव्य परीवाराच्या वतीने आयुषी खेडकर भारतीय वायुसेनेत पाय़टर पायलट पदासाठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार ढाकणे यांच्या हस्ते कऱण्यात

आला. यावेळी अँड. प्रताप ढाकणे, सैन्यदलातील उपविभागीय अधिकारी अभिषेक पानसरे, चंद्रभागा खेडकर. डॉ.नितीन खेडकर, डाँ.मनिषा खेडकर, शिवशंकर राजळे, अँड. दिनकर पालवे, गहिनाथ महाराज खेडकर,शामराव खेडकर,शिवाजी बडे ,अजिंक्य खेडकर उपस्थीत होते. 

 यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले, वायुसेनेत आयुषी खेडकरची झालेली निवड पाथर्डीकरांचा उर भरुन आणणारी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत पाथर्डीच्या भुमिपुत्राची कामगिरी कायम उत्कृष्ट राहीलेली आहे. वायुसेनेत आयुषीने केलेली कामगिरी ही देशाची कामगिरी ठरणार असल्याने तिने पाथर्डीचे नाव जगाच्या नकाशावर घेवुन जावे .पाथर्डी करांनी वेगवेगळ्या सेवेत चांगले अधिकारी राज्य व देशाला दिले आहेत.ते सर्वजन त्यांची कर्तबगारी सिद्ध करीत आहेत.महीलांना सैन्य दलात दिलेली संधी प्रेरणादायी आहे. बुद्धीच्या कौशल्यावर आपले विद्यार्थ्यी चांगली कामगिरी बजावत आहेत. येथील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयुषीची कामगिरी उत्तमच आहे. 

 यावेळी आयुषी खेडकर म्हणालीमला माझे कुटुंब,मित्र-मैत्रीणीमुळे आणि पुणे येथील कर्नल गोखले यांच्या मार्गदर्शनामुळे सैन्यदलात काम करण्यासाठी ही संधी मिळाली आहे. तुम्ही कुठुन आलात याला काहीच महत्व नसते. ध्येयाने वेडे व्हा. कठोर परीश्रम घ्या यश तुमच्या जवळ येईल.तुमचे आशिर्वाद माझ्या देशसेवेत मला उपयोगी पडतील. डॉ.दिपक देशमुख यांनी प्रस्ताविक केले तर शिवाजी मरकड  सुत्रसंचालन व तुपे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या