लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
भेंडा: दि. २० ऑगस्ट रोजी रात्री आठच्या दरम्यान भेंडे येथे मळीच्या ओढ्या जवळ झालेल्या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या अपघातात उपचारा अगोदर एकाचा मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी असुन त्याचेवरही उपचार चालु आहेत. यापुर्वीच जर खड्डे बुजविले असते तर या अपघातात हा मृत्यू झाला नसता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित आधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे.
३ आॕगस्ट रोजी बांधकाम खात्यास मेल पाठवुन संबंधित उप
अभियंत्यांशी तातडीने खड्डे बुजविण्याबाबत प्रत्यक्ष चर्चा केली होती. याचे टेंडर
झाले असुन लवकरच खड्डे बुजविणार आहोत, असे संबंधित
अधिका-याने सांगितले होते. परंतु ठेकेदाराने या कामास विलंब लावल्याने व खात्याने
दुर्लक्ष केल्याने अखेर खड्डयाने एक बळी घेतलाच.
0 टिप्पण्या