Ticker

6/Breaking/ticker-posts

सावधान ..: कानातच ब्लू-टूथ ईअरफोनचा स्फोट, व्यक्तीनं गमावले प्राण..

 

मोबाईल, ब्लू-टूथ ईअरफोन वापरणाऱ्यांनो सावधान!


जयपूरमध्ये एका व्यक्तीनं गमावले प्राण

मोबाईल, ब्लू-टूथ ईअरफोनचा अतिवापर टाळा


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जयपूर : जयपूरमध्ये घडलेल्या एका अजब घटनेत एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागलेत. गाणं ऐकताना कानातच ब्लू-टूथ ईअरफोन स्फोट झाल्यानं या  ऐकणारा जागीच ठार झालाय. शुक्रवारी ही घटना घडली.

कदाचित अशा प्रकारची ही देशातील पहिलीच घटना असू शकेल. या अगोदर अनेक जण मोबाईल किंवा पॉवर बँकेच्या स्फोटात मृत्युमुखी पडल्याचं किंवा जखमी झाल्याच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं. परंतु, ब्लू-टूथ ईअरफोनच्या अतिवापरामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असावी.

जयपूरपासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चोमू भागातील उदयपुरिया गावात राकेश नागर या तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. आपल्या घरीच असताना मोबाईल फोनवर ब्लू-टूथसहीत गाणं ऐकण्याचा राकेशला छंद होता.

घटना घडली त्यावेळी राकेशनं आपला मोबाईल ब्लू-टूथनं ईअरफोनशी कनेक्ट केला होता. दोन्ही कानांवर ब्लू-टूथ ईअरबइज लागलेले होते. मात्र, अचानक दोन्ही ईअरबड्जमध्ये स्फोट झाला. यामुळे राकेश नागर गंभीर जखमी झाला आणि त्याच्या कानांतून रक्तस्राव होऊ लागला. बेशुद्ध होऊन राकेश जमिनीवर कोसळला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तरुणाला मृत घोषित केलं.

राकेशची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ईअरबड्सचा स्फोट झाल्यानंतर संभाव्यत: हृदयविकाराच्या धक्क्यामुळे राकेशचा मृत्यू झाला असावा. २८ वषीय राकेश अनेकदा ईअरफोन लावून मोबाईलचा वापर करत होता तसंच तो गाणी ऐकण्यसााठी ईअरपड्सचा वापर करत होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिलीय.

मोबाईलचा अतिवापर करताना धोका टाळण्यासाठी वापरले जाणारे ईअरफोनही सुरक्षित नसल्याचं या घटनेतून समोर येतंय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या