Ticker

6/Breaking/ticker-posts

लाँचिंग आधीच Vivoच्या ‘या’ स्मार्टफोन्सची माहिती लीक, दमदार फीचर्ससह बाजारात करणार एंट्री

 

Vivo V21 Pro आणि Vivo Y72 5G स्मार्टफोन होणार लाँच.

विवो याच महिन्यात दोन्ही फोन लाँच करणार.

लाँचिंगच्या आधी फीचर्स आणि किंमत लीक.

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : Vivo V21 Pro आणि Vivo Y 72 5G स्मार्ट फोन  लवकरच भारतात लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी Vivo Y 72 5G चे पोस्टर समोर आले होते. यात फोनच्या रॅमडिस्प्ले आणि ऑफर्सविषयी माहिती समोर आली होती. आता नवीन लीकमध्ये फोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. तर Vivo V21 Series च्या प्रो मॉडेलची देखील किंमत समोर आली आहे. या दोन्ही फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

विवोचे हे दोन्ही फोन याच महिन्यात लाँच होणार आहे. रिपोर्टनुसार Vivo V21 Pro 5G स्मार्टफोनची किंमत जवळपास ३३,००० रुपये असेल. तर मिड रेंज ५जी फोन Vivo Y72 ची किंतम २३,००० रुपये असू शकते.

 Vivo V21 Pro, Vivo Y72 5G ची संभाव्य किंमत

 रिपोर्टनुसार, Vivo V21 Pro च्या सुरुवाती व्हेरिएंटची किंमत ३२,९९० रुपये असू शकते. कंपनीने एप्रिल महिन्यात विवो व्ही२१ स्मार्टफोनला भारतात सादर केले होते. याचे बेस मॉडेल ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीची किंमत २९,९९० रुपये आहे. दोन्ही फोन लूक आणि डिझाइनमध्ये समान आहेत.

Vivo   Y72 5G ची  किंमत २२,९९० रुपये असू शकतेही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची असेल. फोनला  थायलंडमध्ये THB ,९९९ (जवळपास २३,३०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. मात्रफोनचा लूक ग्लोबली लाँच झालेल्या मॉडेलपेक्षा वेगळा आहे. यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले मिळतोजो ग्लोबल व्हेरिएंटमध्ये नाही.

 लाँच कधी ?

 रिपोर्टनुसार, Vivo V21 Pro 5ला जुलैच्या अखेरीस लाँच केले जाऊ शकते. तर Vivo Y72 5ला १५ जुलैला लाँच केले जाईल. हा फोन ग्रेफाइट ब्लॅक आणि ड्रीम ग्लो रंगात येतो. फोनमद्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले८ जीबी रॅम + ४ जीबी व्हर्च्यूल (एक्सटेंडेट) रॅम फीचर मिळेल. फोनमद्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. मात्रकंपनीकडून दोन्ही फोनबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या