*निकालासाठी मंडळाने जाहीर केले संकेतस्थळ
*दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना मिळणार निकाल
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या
विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही
विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने
विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत.
त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना
निकाल पाहता येणार आहे.
याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत
संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.
कसा तयार झाला निकाल?
इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी
मूल्यमापन आणि इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा/अंतर्गत मूल्यमापन
आदींच्या आधारे माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण दिले आहेत.
त्यानुसार मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे.
श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणीकृत विद्यार्थ्यांचा निकाल नाही
ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ या वर्षीच्या
परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार
करण्यात आलेला नाही, असे मंडळाने कळवले आहे. या
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार
नसल्याने या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने स्पष्ट केल.
0 टिप्पण्या