Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस; रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तळकोकणाला पावसानं झोडपून काढल्यानंतर मुंबईतही काल मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईबरोबरच ठाणे व नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे.

मुंबईसह ठाण्यात गुरुवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. सतत बरसणाऱ्या या पावसामुळं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातील काही भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्यानं या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग शहरात येत्या तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्गातही काहीशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात केली आहे.

 

मुंबई लोकलच्या सेवेला पावसाचा तडाखा

  सिंधुदुर्गातही काहीशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात केली आहे.

कुर्ला-विद्याविहार स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले; मध्ये व हार्बर रेल्वेची वाहतूक २०- २५ मिनिटे उशीरा

मुसळधार पावसाचा वाहतूकीला फटका; मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक मंदावली
मुसळधार पावसामुळं वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवातसिंधुदुर्गः तिलारी धरण क्षेत्रातील कॉजवे पाण्याखाली; पाच गावाचा संपर्क तुटला, पुरस्थीती कायम

ठाणे, रायगड, रत्नागिरीतही पावसाची संततधार सुरूच
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या