Ticker

6/Breaking/ticker-posts

२२२ कोटींचे बनावट व्यवहार उघड; GST विभागाची मोठी कारवाई

*बनावट देयके दाखवून २१३.६७ कोटींचा परतावा मिळवला.

*जीएसटी महासंचालनालयाच्या गुप्तचर विभागाने केला पर्दाफाश.लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नागपूर : बनावट देयके सादर करून २१३.६७ कोटी रुपयांचा परतावा मिळविणाऱ्या एका व्यक्तीला जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या झोनल नागपूर युनिटने उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथून बुधवारी अटक केली.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभर जीएसटी विभागाची कारवाई सुरू आहे. बनावट देयके तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या आधारे इनपुट ट्क्स क्रेडिट  मिळविणारे विभागाच्या रडारवर आहेत. मागील दोन वर्षांमध्ये अशा प्रकारच्या कारवाईंना विशेष गती आलेली आहे. याच अंतर्गत नागपूर झोनल युनिटला मिळालेल्या माहितीच्या आधारे फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, गुवाहाटी आणि चेन्नई येथे धाडी टाकण्यात आल्या.

तपासादरम्यान अस्तित्वात नसलेल्या आठ कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार दाखविण्यात आल्याचे उघड झाले. त्यात २२२.०९ कोटी रुपयांची खोटी देयके जीएसटी पोर्टलला सादर करण्यात आली व त्या आधारावर आरोपीने २१३.६७ कोटींचा परतावा मिळविल्याची बाबही समोर आली. या आठ कंपन्यांद्वारे नागपुरातील तीन कंपन्यांकडे परतावा हस्तांतरित करण्यात आला असून प्रत्यक्षात या तीनही कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील तीन कंपन्यांवर अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. त्या कंपन्यांशी आरोपीचे कनेक्शन आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

२८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेला आरोपी हा संबंधित कंपन्यांच्या नावाने असलेली बँक खाती हाताळायचा. त्याने या बँक खात्यातून १२ हजार ३९७ कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांवर वळते केले. तसेच काही रक्कम वापरली. आरोपीला अटकेनंतर विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने २८ जुलैपर्यंत न्यायालयील कोठडी सुनावली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या