Ticker

6/Breaking/ticker-posts

१०० कोटींच्या आरोपांची चौकशी, ED चे पथक संगमनेरच्या फार्महाउसवर

 *अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपांची चौकशी सुरूच

*ईडीचे पथक पोहोचले संगमनेर तालुक्यातील फार्महाऊसवर

*मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याच्या घरी छापा







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

संगमनेर: मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुलीची सध्या चौकशी सुरू आहे. यातील एक पथक काल संगमनेर तालुक्यात येऊन गेले. मुंबई पोलिस दलातील एका अधिकाऱ्याच्या शेतातील घरावर छापा घालून त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, यामध्ये पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याने पथकाला हात हलवत परतावे लागले.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भुजबळ मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावचे आहेत. त्यामुळे मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने तेथे जाऊन सुमारे तीन तास कसून केली.

पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक गावीच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाईकांची माहिती मिळाल्याने पथकाने येथे येऊन चौकशी केली. भुजबळ यांच्या येथील नातेवाईकांचे जवाब नोंदवून ही पथके परत गेली. या चौकशीतून अधिकार्‍यांच्या हाती काय लागले हे मात्र गुलदस्त्यात आहे॰

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या