Ticker

6/Breaking/ticker-posts

हातगाव येथे आषाढी एकादशी निमित्त श्री. संत सावता महाराज अभंग

.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे आषाढी एकादशी निमित्त श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जीवन चरित्रावरती लिहिलेला अभंग सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत गितकार श्री.वसंत अभंग यांचा सत्कार करून सादर करण्यात आला .

गीतकार- वसंत अभंग यांनी अभंगाचे वाचन करून सारांश सांगितला ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या साठी गावातील दिलदार व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे श्री.दिपक (भाऊ )अभंग, सावता परिषेद जिल्हा उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब सुसे, श्री.संदीप अभंग सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

वसंत अभंग हे शेतकरी असुन शिक्षण सातवी आसल्यामुळे गावकऱ्यांनी त्याचे मनापासुन कौतुक केले. सदर गीत ऑरेंज कॅसेट ऑफिशियल युट्युब वर प्रदर्शित करण्यांत आले आहे. सदर अभंगाचे लिखाण वसंत अभंग यांनी केले असून गायन श्री.विकास साळवे यांनी केले आहे. संगीत संयोजन श्री.अविनाश बुटे व श्री. के.बी.शेख यांनी केले असून साह्य- श्री. मनोज जौंजाळ श्री.संदिप अभंग (सर) यांनी केले

यावेळी सरपंच श्री.अरुण मातंग प्रा.संतोष भराट सर प्रा.महादेव मुंढे अविनाश बुटे के.बी.शेख यांनी आपल्या भाषणातून गितकार, संगीतकार व गायक यांचे कौतुक केले .

यावेळी उपसरपंच श्री.चरणसिंग परदेशी, श्री.ज्ञानदेव अभंग, श्री.बाबासाहेब बुटे, श्री.पोपट अभंग, श्री.रामेश्वर गलांडे, श्री.जगन्नाथ (तात्या) अभंग, श्री.बबन भालेकर, श्री.मधुकर वैद्य, श्री.महादेव अभंग, श्री.अकुंश अभंग, श्री.सचिन अभंग, श्री.दिपक चौधरी, श्री.दिपक सुसे, श्री.बाळासाहेब नरके, श्री.बद्री नरके, श्री.राजु नरके, श्री.नारायण अभंग, राजु आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बि शेख यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या