Ticker

6/Breaking/ticker-posts

पथविक्रेत्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून कॅश बॅक सुविधा चा लाभ घ्यावा : अजित निकत

बँक ऑफ बडोदाच्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्मपतपुरवठा  वितरण कार्यक्रम












लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



देवळालीप्रवरा : “बँकेकडे आपली पथ निर्माण केल्यास व्यवसायासाठी लागणारे कर्ज बँकेकडून सहज उपलब्ध होऊ शकते.पथविक्रेत्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून निधी परतावा (कॅश बॅक) सुविधाचा लाभ घ्यावा," असे आवाहन देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले.

      बँक ऑफ बडोदा च्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पी.एम.स्वनिधी) पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्मपतपुरवठा अंतर्गत लाभार्थींना कर्ज मंजुरीपत्र नुकतेच देण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बँक ऑफ बडोदा चे शाखाधिकारी कैलास गांगुर्डे,श्रीकांत बडे,पांडुरंग डुकरे, कार्यालयीन अधिक्षक बंशी वाळके आदी.मान्यवर उपस्थित होते.

      पुढे बोलताना मुख्याधिकारी श्री.अजित निकत म्हणाले कि,"आपल्या व्यवसायातील छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी कोरोना कालावधीत बँकेकडुन रु १०,००० कर्ज सहजपणे उपलब्ध होत आहे,त्याची परतफेड मुदतीत केल्यास बँकांच्या इतर सोईसुविधाचा लाभ मिळू शकतो,नगरपरिषदे कडून लाभार्थीना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला जातो,त्या व्यक्तीची पत महत्वाची असते,त्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे," 

    शाखाधिकारी श्री.कैलास गांगुर्डे म्हणाले कि, "देवळालीप्रवरा नगरपरिषदे कडून आलेल्या सर्वच कर्ज प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून योग्य लाभार्थीना लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत," देवळालीप्रवराचे नगराध्यक्ष  कदम यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.महिला सक्षमीकरण अंतर्गत प्रतिभा महिला बचत गटास कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चे सहा.प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.शेवटी समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले. यावेळी नगरपरिषदेचे लेखाधिकारी कपिल भावसार,सुदर्शन जवक,अशोक गाडेकर,रावसाहेब टिक्कल, कय्युम शेख यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमात बँकेच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या