Ticker

6/Breaking/ticker-posts

ओपन स्पेसच्या सुशोभीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे- मा.महापौर बाबासाहेब वाकळे

 नगरसेवक रामदास आंधळे यांच्या माध्यमातून शिवनगर मध्ये पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर : शहरामध्ये विविध ठिकाणी महापालिकेचे ओपन स्पेस उपलब्ध आहेत त्या भागाचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. निर्मलनगर परिसरातील शिवनगर मधील ओपन स्पेसचे सुशोभिकरणा साठी नगरसेवक रामदास आंधळे यांनी पुढाकार घेतला असल्यामुळे या ओपन स्पेसचा नागरिकांच्या सहकार्यातून कायापालट झाला आहे. आपल्या परिसरातील ओपन स्पेसच्या सुशोभीकरणासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे यावे, नागरिकांनी घ्यावा ,असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

नगरसेवक रामदास आंधळे यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.2 मधील निर्मलनगर ,शिवनगर मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मा.महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,नगरसेवक सुनील त्र्यंबके,मा.नगरसेवक निखिल वारे,मा.नगरसेवक बाळासाहेब पवार,अभिजात चिप्पा,किशोर कानडे तसेच आदी नागरिक उपस्थित होते.

वाकळे पुढे बोलताना म्हणाले की,नगर शहरातील प्रत्येक भागातील ओपन स्पेसचे सुशोभीकरण करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे जेणेकरून याप्रयत्नांमुळे आपल्या भागाच्या विकासाला गती मिळेल व सुशोभिकरणामुळे प्रभागाच्या सुंदरतेत भर पडेल,

 यावेळी बोलताना नगरसेवक रामदास आंधळे ते म्हणाले की, शिवनगर मधील नागरिकांनच्या एकत्रिकरणा मुळे शिवनगरच्या विकासाला चालना मिळाली या ओपन स्पेसच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. राहिलेले उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरवठा करून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागाच्या सुंदरतेत भर पडेल असे ते म्हणले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या