लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नेमकं काय घडलं होतं, पाहा...
काही
वर्षांपूर्वीही ही गोष्ट आहे. दीपक चहर हा चांगली कामगिरी करत होता. पण त्याच्या
काही गोष्टी प्रशिक्षकांच्या डोळ्यात खुपल्या होत्या. दीपकही उंची जास्त आहे, त्यामुळे
त्याने क्रिकेट खेळायला विचार करू नये, त्याने कोणत्या
दुसऱ्या क्षेत्रात आपले करीअर करावे आणि क्रिकेट सोडून द्यावे, असे त्याला प्रशिक्षकांनी सांगितले होते. या गोष्टीचा खुलासा आता झाला
असून त्याचा पुरावाही भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने दिला आहे. पण या गोष्टीनंतर
दीपकने क्रिकेट खेळण्याचा आपला ध्यास कायम ठेवला आणि तो प्रामाणिकपणे आपले काम करत
गेला. जर दीपकने त्यावेळी या प्रशिक्षकांचे ऐकले असते तर भारताचा असा मॅचविनर
खेळाडू आज भेटला नसता.
दीपक हा राजस्थानच्या संघाकडून
खेळत होता. त्यावेळी राजस्थानच्या प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू
ग्रेग चॅपेल हे विराजमान होते. चॅपेल यांनी दीपकला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला
होता. आज या गोष्टीचा खुलासा भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने केला आहे.
प्रसादने याबाबतचे एक ट्विट केले आहे.
0 टिप्पण्या