Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्र्यांसोबत 'या' वारकरी जोडीला मिळणार आषाढीच्या पूजेचा मान

 

*ईश्‍वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली निवड



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

सोलापूर : करोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरची आषाढी यात्रा ही प्रतिकात्मक साजरी होत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे २० जुलै रोजी पहाटे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. त्यांच्या समवेत महापूजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई यांना मिळाला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

मानाचे वारकरी असणारे केशव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील असून त्यांचे वय ७१ वर्षे आहे. गेल्या वीस वर्षापासून ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील वर्षीपासून वारी भरत नसल्याने महापूजेचा मान विणेकर्‍यांना देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानुसार यंदा केशव कोलते यांना हा मान देण्यात आला आहे.

केशव कोलते यांची निवड ईश्‍वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली असून यासाठी दोन विणेकरी यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. यात बापू साळुजी मुळीक यांचाही समावेश होता. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, प्रकाश जवंजाळ महाराज, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या